☣️ आधारभूत धान खरेदी योजनेचा असा घ्या लाभ.
_Breaking Updates_
शासकीय आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत रब्बी धान खरेदी सन 2021-22 साठी शेतकरी नोंदणीला सुरुवात.
🔰 पाहा नोंदणीची अंतिम तारीख -
शासकीय आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत रब्बी धान खरेदी सन 2021-22 साठी शेतकरी नोंदणीला सुरुवात झालेली असून, शेतकरी नोंदणी अंतिम दिनांक 30/04/2022 हे आहे.
वीस दिवसांत पूर्ण करावी लागणार नोंदणी.
🔰 नोंदणी कुठे करायची ?
आपल्या जवळच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकरी नोंदणी करून घ्यावी.
🔰 नोंदनी करीता लागणारे कागदपत्रं -
• 7/12 सत्यप्रत ( 7/12 वर खसरा भरलेला असावा धान्याचे नाव व वर्ष असावा )
• नमुना 8 सत्यप्रत
• आधार कार्ड झेरॉक्स
• बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक झेरॉक्स
• शेतकरी नोंदणी अर्ज
• संमती पत्र ( 5 रु कोर्टाची टिकिट )
• बँक हमीपत्र
• स्वयं घोषणा पत्र
• पासफोटो
🔰 MSP मार्फत मिळणारे दर किती ?
🔹साधारण धान दर 1940 रू प्रती क्विंटल
🔹एफ यू दर्जेचा धान दर 1960 रू प्रती क्विंटल
🔰 रब्बी हंगमातील योजनेची मुद्दत किती आहे ?
राज्यात धान व भरडधान्य खरेदी सुरु करण्याबाबतच्या सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पणन हंगाम २०२१-२२ (रब्बी) मधील धान खरेदीसाठी दि.१ मे, २०२२ ते दि.३० जून, २०२२ असा कालावधी व भरडधान्य खरेदीकरीता स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येतील अशा सुचना आहेत.
शासन निर्णय पाहा- https://drive.google.com/file/d/1MJZfu_i5USYIKvnAZQVFAmOde9Hgarjc/view?usp=drivesdk
धन्यवाद




0 Comments